💥राज्यात 63 हजार 342 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 25 (प्रतिनिधी) : राज्यात आज 3661रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 77 हजार 453 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.42 टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या 4841 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 63 हजार 342 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8लाख 48हजार 26 नमुन्यांपैकी 1 लाख 47 हजार 741 नमुने पॉझिटिव्ह (17.42 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 56 हजार 428 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 33 हजार 952 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज 192 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी 109 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 83 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.69 टक्के एवढा आहे.
मागील 48 तासात झालेले 109 मृत्यू हे मुंबई मनपा-58, ठाणे मनपा-3, नवी मुंबई मनपा-1, भिवंडी-निजामपूर मनपा-1,मीरा-भाईंदर मनपा-2,वसई-विरार मनपा-2,रायगड-1, जळगाव मनपा-1, जळगाव-4, नंदूरबार-1, पुणे-1, पुणे मनपा-16, पिंपरी-चिंचवड मनपा-4, सातारा-1, औरंगाबाद-2, औरंगाबाद मनपा-8, अकोला-1, अकोला मनपा-1, बुलढाणा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील 2 मृत्यूंचा समावेश आहे.
- एकूण: बाधित रुग्ण-(1,47,741), बरे झालेले रुग्ण- (77,453), मृत्यू- (6,931), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(15),ॲक्टिव्ह रुग्ण-(63,342)
0 टिप्पण्या