💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणे आजी-माजी लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांंना पडले महागात..!💥जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत प्रवेशद्वारासमोर कापूस फेकून आंदोलन करणाऱ्या भाजपवाल्यांवर गुन्हे दाखल💥

परभणी-(दि.04 जुन)-येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकऱ्यांना पिककर्जाच्या वितरणासह कापूस खरेदीतील विलंबाच्या निषेधार्थ आज गुरुवार दि.04 रोजी सकाळी आजी-माजी भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी कापूस फेकून आंदोलन केले.आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधात येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरील आंदोलनात माजी आ.मोहन फ़ड, माजी आ.रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे, माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, बाळासाहेब जाधव आदीनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या पोर्चमध्ये कापूस आणून फेकला. पाठोपाठ प्रचंड घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. त्याच ठिकाणी पाय-यावर ठिय्या मारून आंदोलन सुरू केले होते.
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदा 2005, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 वगैरे आदेश लागू असतांना भाजपच्या मंडळींनी केलेल्या या आंदोलनाने प्रशासन ही बुचकळ्यात पडले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या