💥उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी आज शुक्रवार दि.१२ जुन रोजी बजावले आदेश💥
परभणी-(दि.१२ जुन)-परभणी शहरासह तालुक्यातील काही मंदिर,मशिदींच्या जमिनीतील काही जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश महसुल प्रशासनाने दिले आहेत. या जमिनी संदर्भात सुरू असलेले दावे फेटाळण्यात आल्याने या जमिनीचा ताबा घेवून त्या बाबतचा अहवाल १६ जून २०२० पर्यंत सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी आज शुक्रवार दि.१२ जुन रोजी बजावले आहे.
शहरासह तालुक्यात मंदिर,मशिदींच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत.या जमिनीच्या संदर्भात विरासत व पुर्नरिक्षण अर्ज दाखल होते. ते दावे फेटाळण्यात आले आहेत.
यात प्रामुख्याने शहरातील विठ्ठल-रूख्माई मंदिराच्या गट नं, सर्वे नंबर २३ मधील ९ हेक्टर ३१ आर पैकी ७ हेक्टर ९६ आर आणि गट क्रमांक २४ मधील ७ हेक्टर ७८ आर पैकी प्रभाकर रामभाऊ गुंडाळे यांचा १/४ हिस्सा वगळून उर्वरीत ३/४ जमिन संपादीत केली जाणार आहे.
कारेगाव येथील मशिद महेबुब शाहीच्या सर्वे नं ९०,९१ मधील गट नंबर ३४१ मधील २२ हेक्टर २२ आर पैकी, मांडाखळी येथील जामा मशिदीच्या सर्वे नंबर १३४,गट नं.१३७ मधील १० हेक्टर ३४ आर, परभणीतील शर्त खिदमत कजात सर्वे नंबर ७० मधील ३० एकर ४ गुंठे जमिन ताब्यात घेण्यात येणार आहे.
मौजन मशिदीच्या सर्वे नं.२५० मधील २७ एकर २ गुंठे जमिन, शर्त खिदमत कजातच्या सर्वे नं ४८ मधील एक हेक्टर ३० आर, शर्त खिदमतच्या सर्वे १२८/१ मधील ३ हेक्टर १९ आर,सर्वे नंबर १२८/२ मधील ३ हेक्टर २४ आर,सर्वे नंबर १२८/३ मधील सहा हेक्टर ४६ आर जमीन ताब्यात घेतली जाणार आहे.
परभणीतील शाही मशिद सर्वे नंबर ५२१ मधील ४ एकर २५ गुंठे,शर्त खिदमत तुळशीबागच्या सर्वे नंबर १३१ मधील ८ एकर ३५ गुंठे, मौजन मशिदीच्या सर्वे नंबर २५५ मधील २९ एकर ६ गुंठे जमिन प्रशासन ताब्यात घेणार आहे.
शहरातील बालाजी मंदिराच्या सर्वे नंबर ६४६ मधील १२ एकर ५ गुंठे, शर्त खिदमतमापच्या सर्वे नंबर ३५२/१ मधील ३१ आर जमिन तर दर्गाह इसाक मौलवी साबच्या गट नंबर ६६५ मधील ८ हेक्टर ४५ आर जमिन प्रशासनाने ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दैठणा येथील समाधीपुरीच्या १८९,१९०,१९१,१९२ या गट सर्वे मधील जमिन आणि दैठणा येथील बालाजी देवस्थानच्या १६७ सर्वे नंबर मधील ५ हेक्टर ३८ आर आणि सय्यदमियॉ पिंपळगाव येथील बालात्मज भाऊसाहेब देव,पेडगाव सर्वे नंबर ६८,गटनंबर २६७ मधील ४ हेक्टर ९२ आर जमिन महसुल प्रशासनातर्फे ताब्यात घेतली जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.कुंडेटकर यांनी आदेशात म्हटले आहे...
0 टिप्पण्या