💥परभणी येथील व्यापारी संघटनेच्या भवनाच्या आवारात जुगार खेळणाऱ्या धनडांडग्या ५ जुगारड्यांवर गुन्हे दाखल...!💥प्रकरणात ५ लाख ५३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त,या प्रकरणी नवा मोंढा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल💥

परभणी (दि.०९ जुन) -शहरातील मध्यवस्तीतील व्यापारी संघटनेच्या भवनाच्या आवारात सोमवार दि.०८ जुन २०२० रोजी राञी जुगार खेळणाऱ्या पाच प्रतिष्ठीत धनदांडग्या बडया व्यापाऱ्यांच्या विरोधात नवा मोंढा पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या जुगार खेळणाऱ्या आरोपीं मध्ये दिलीप राऊत,संजय मंञी,चेतनकुमार मुंदडा रा झरी,सतिष घाटगे,दिपक भानुशाली यांचा समावेश असून अंदर-बाहर जुगार खेळतांना पथकांच्या तावडीत हे ५ आरोपी रंगेहात सापडले होते. त्यांच्याकडून पथकाने १ लाख ४२ हजार ६० रूपये नगदी रक्जकमेसह मोबाईल,४ मोटारसायकल,अन्य जुगार साहित्यासह एकूण ५ लाख ५३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केला.या जुगार धाड प्रकारणा नंतर व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गंगाखेड रस्त्यावरील एका जिनिंगच्या आवारात पत्ते खेळणारे काही व्यापारी पकडल्याचे प्रकरण ताजे असतांनाच मध्यवस्तीतच तेही बडे व्यापारी पकडल्याची घटना समोर आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या