💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात आज १९ जुन रोजी ४ कोरोना संशयित रुग्ण दाखल...!💥जिल्हा शासकीय रुग्णालयात आज १५ रुग्णांचे स्वॅब आले निगेटीव्ह💥

परभणी (दि.१९ जुन) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज शुक्रवार दि.१९ जुन रोजी नव्याने ४ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले असून.संशयितांची संख्या आता २५५६ झाली आहे.घेण्यात आलेल्या एकूण स्वॅबची संख्या २७५२ झाली असून एकूण २५२५ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून एकूण प्रलंबीत स्वॅबची संख्या अवघी ६ राहिली आहे. आतापर्यंत ८० अनिर्णायक ४७ स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल  नांदेड प्रयोगशाळेद्वारे  प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९४ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. ८८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात अवघे तीन कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत.त्यांचीही प्रकृती स्थिर आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या