परभणी (दि.२८ जुन):-जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढता कामा नयें याकरिता प्रशासनाने सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू केला असतांनाही लोक कोरोना व्हायरस या भयंकर जागतिक महामारीचे गांभीर्य लक्षात न घेता सर्रास सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्कचा वापर न करता फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने सक्त करवाईचे आदेश जारी केले आहेत.
आधी केवळ मनपा च्या वतीने किरकोळ स्वरूपात कारवाई करण्यात येत होत्या आणि मास्क/रुमाल न वापरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल केला जात होता पण आता गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे यात पोलीस प्रशासन देखील कारवाईत पुढे असणार आहेत
ज्यात यापुढे कोणीही विना मास्क/रुमाल तोंडावर सार्वजनिक ठिकाणी येईल अशांना पहिले २०० रुपयें व दुसरे वेळी असे वागल्यास ५०० रुपये दंड आनि परत असेच वागल्यास सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याचा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
त्यामुळे आता तरी नागरिकांनी व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी यापुढे जागरूक राहून सार्वजनिक ठिकाणी मास्क/रुमाल तोंडा वर बांधून ठेवावा मानेवर आथवा हनुवटीवर बांधू नका नसता वरील कारवाईस पात्र रहाल....
0 टिप्पण्या