💥पुर्णा तालुक्यातील भुतकाळात जमा झालेल्या 'पुर्णा नागरी बँकेच्या' सातबारा वरील बोजा मुळे शेतकरी अडचणीत...!💥पुर्णा तालुका सहकार अधिकारी व महाराष्ट्र ग्रामीन बँक ताडकळच्या अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत शेतकरी संतप्त💥

पूर्णा -(दि.02जुन) /तालुक्यातील भुतकाळात जमा झालेल्या अर्थात मागील अनेक वर्षापासून बंद झालेल्या पुर्णा नागरी बँकेच्या सातबारा वरील बोजा मुळे शेतकरी अडचणीत आला असून शेतकऱ्यांनी सातबारा वरील बोजा उडवून आणल्याशिवाय माफीचा लाभ मिळणार नाही नवीन कर्ज देणार नाही अशी अडवणूक शेतकऱ्यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा ताडकळसच्या अधिकाऱ्यांनी करीत नवीन कर्ज देण्यास नकार दिल्याचा आरोप कळगाव येथील शेतकऱ्यांनी केला असून महाराष्ट्र ग्रामीण बँक ताडकळस शाखेचे मॅनेजर यांनी शेतकऱ्यांना  माफीचा लाभ देऊन कर्ज न दिल्यास आमरण उपोषण करू असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

मागील काही वर्षापूर्वी कार्यरत असलेली पूर्णा येथील पूर्णा नागरी सहकारी बँक येथे शेतकऱ्यांचे व्यवहार होते पण बऱ्याच दिवसापासून ती बँक बंद असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना त्या बँकेच्या सातबारा वरील बोजाचा आता नाहक त्रास सहन करावा लागत आहे पेरणीच्या वेळी पैसा उपलब्ध करायचा तरी कुठून असा यक्षप्रश्न शेतकरी वर्गाकडून होतआहे यावर पूर्णा येथे ए.आर ऑफिस येथे त्यांनी संपर्क साधला असता अद्याप आम्हालाही त्या बँकेबद्दल स्पष्ट काही माहिती नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले त्यामुळे आता शेतकऱ्यांपुढे अडचणीचा मोठा डोंगर उभा असल्यामुळे शेतकरी बँक अधिकारी व संबंधित सहकार अधिकारी यांच्या टोलवाटोलवीत शेतकरी चांगलाच साछपडलेला असून त्यांची अडचण दूर होते का ? असा नाराजीचा सूर शेतकरी वर्गातून जोर धरू लागला आहे.शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात नवीन कर्ज मिळण्यापासून वंचित ठेवल्यास बँके समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा कळगाव येथील शेतकरी विठ्ठल सुर्यवंशी यांनी दिला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या