💥जिल्ह्यात आता एकूण कोरोना संशयितांची संख्या २६८० एवढी झाली आहे💥
परभणी (दि.३० जुन) - परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात आज मंगळवार दि.३० जुन रोजी ६ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले असून त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण संशयितांची संख्या २६८० एवढी झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातून आज मंगळवार दि.३० जुन रोजी ०५-०० वाजेपर्यंत एकूण ६ संशयिताचे स्वॅब घेवून ते नांदेड येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले तर तेथील प्रयोग शाळेकडून प्राप्त स्वॅबच्या अहवालाप्रमाणे तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या त्यात झरी, रामकृष्णनगर व काद्राबाद प्लॉट भागातील प्रत्येकी एक व्यक्तीचा स्वॅब पॉझीटीव्ह आढळून आला. या तिन्ही व्यक्ती कुटुंबातील किंवा नातेवाईकाच्या संपर्कात आल्या होता.
नांदेडच्या प्रयोगशाळेप्रमाणे पाच संशयितांचे स्वॅब हे निगेटीव्ह आले आहेत. आता तेथील प्रयोगशाळेत एकूण ८ स्वॅब प्रलंबीत आहेत अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
जिल्ह्यात संशयित रुग्णांची संख्या २६८० एवढी झाली आहे. संक्रमीत कक्षात २० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी बोलताना दिली आहे.
आजपर्यंत २८८५ स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यापैकी २६३३ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत ८३ अनिर्णायक ४७ स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल नांदेड प्रयोगशाळेद्वारे प्राप्त झाला आहे.एकूण प्रलंबीत स्वॅबची संख्या ८ एवढी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११५ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला.आता रुग्णालयात २० कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात एकूण ३० रुग्ण असून विलगीकरण केलेल्या कक्षात १०७ रुग्ण असून विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले २५४३ एवढे व्यक्ती आहेत,अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील सूत्रांनी दिली...
0 टिप्पण्या