💥आज शनिवार रोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोग शाळेतील नमूने तपासणी अहवालात नव्या २२ रुग्णांची भर💥
नांदेड (दि.१३ जुन)नांदेड शहरात दोन ठिकाणावरून कोविड-१९ च्या कोरोनांचे नमूने तपासले जात आहे. यामध्ये शनिवार दि.१३ जून रोजी महापालिकेच्या हद्दीत कोरोनाच्या रुग्ण वाढण्याचा सिलसिला कायम असून आजरोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोग शाळेतील नमूने तपासणीचा अहवालामध्ये नव्या २२ रुग्णांची भर पडल्याचे सुत्रांकडून समजते. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या तपासणाचा रिपोर्ट येणे दुपारपर्यंत बाकी होते.
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी १० तर गुरुवारी २२ रुग्ण कोरेाना पॉझिटीव्ह आले होते. कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दुहेरी संख्येत मागच्या दोन दिवसांमध्ये होती. ही आकडेवारी कायम राहिली, असून गुरुवारप्रमाणे शनिवारी सुद्धा रुग्णांची संख्या २२ पेक्षा अधिक असणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोग शाळेच्या कोरोना तपासणी अहवालामध्ये २२ रूग्ण हे नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीमधील आहेत.ही संख्या २२ आहेे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील अहवाल काय येतो, याकडे ही लक्ष असणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कालपर्यंत २३४ इतकी होती. यात आजच्या २२ रुग्णांची भर पडल्यास रुग्णसंख्या २५६ आणि वैद्यकीय महाविद्यालयातील काही पॉझिटीव्ह आल्यास कोरोनाच्या रुग्णांची संख्या २५६ पेक्षा अधिक जाऊ शकते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित राहणे महत्वाचे ठरणार आहे...
0 टिप्पण्या