💥पुर्णेत क्वारंटाईन असलेल्या लोकांना दिले जाते निष्कृष्ट दर्जाचे भोजन...!



💥तालुका प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत तर नाही ना..?💥

पूर्णा (दि.२९ जुन) - शहरातील पांगरा रोड येथील शासकीय वस्तीगृहात पुणे-मुंबई आणि इतर शहरातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. परंतु त्या लोकांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात आहे. सध्या पूर्णा येथील पांगरा रोड येथे एकूण आठ लोकांना क्वारंटाईन केलेले आहे. त्यामध्ये एक रेल्वे कर्मचारी आहे. आणि त्याचे बायपास झालेले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याला मागील दहा दिवसांपासून क्वारंटाईन केलेले आहे. आणि त्यालाही निकृष्ट भोजन दिले जात आहे. सकाळचे भोजन दुपारी ०१-०० वाजता येते आणि सायंकाळचे भोजन ०७-०० वाजता येते हे शिव भोजन योजनेअंतर्गत दिले जात आहे.

या भोजनामुळे क्वारंटाईन असलेल्या लोकांना संडास-उलटी अशी आजारेे होत आहेत. प्रशासन क्वारंटाईन असलेल्या लोकांच्या भोजनासाठी निधी देत नाही का ? देते तर मग तो निधी जातो कुठे भोजनासाठी आलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार तर होत नाही ना ? असे प्रश्न जनतेमध्ये उपस्थित होत आहेत. प्रशासन या होणारा भ्रष्टाचार कडे लक्ष देणार का ? भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार का ?अशी चर्चा जनतेमध्ये ऐकण्यास मिळत आहे.क्वारंटाईन असलेल्या लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर  प्रशासन कधी कारवाई करणार? निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविणे ही एक भूकबळी नाहीतर काय आहे ?क्वारंटाईन असलेल्या लोकांना भूख बळींचा शिकार व्हावे तर लागणार नाही ना ? भुकबळीमुळे एखादी जीवित हानी झाल्यास यास जबाबदार कोण असाही सवाल जनतेतून केला जात असून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या