💥संत जनाबाई व संत मोतीराम महराज यांच्या पादुका हेलीकॉप्टरद्वारे पंढरपूरला नेण्याची जय्यत तयारी सुरू💥
गंगाखेड / पालम (दि.२१ जुन) : संत जनाबाई व संत मोतीराम महराज यांच्या पादुका हेलीकॉप्टरद्वारे पंढरपूरला नेण्याची जय्यत तयारी सुरू आहे. या पूर्वतयारीचा भाग म्हणून गंगाखेड विधानसभा मतदार संघातील तीन्ही ऊपविभागांचे बांधकाम ऊपअभियंता केदार सोनवणे यांनी आज फळा येथे भेट दिली.
प्रस्तावित हेलीपॅडच्या जागेची पाहणी करून ईतर तांत्रिक बाबींची यावेळी पाहणी करण्यात आली. या प्रसंगी हेलीकॉप्टर वारीचे संयोजक, गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, संत मोतीराम महाराज संस्थानचे सचिव विठ्ठलराव पौळ, पोलीस पाटील केशव तात्या, चेअरमन अशोकराव पौळ, संजय सोनटक्के, बांधकाम ऊपविभाग पालमचे निरीक्षक धापसे, ह.भ.प. सोपानमहाराज व स्थानिकांची ऊपस्थिती होती...
0 टिप्पण्या