💥निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन...!



💥'निसर्ग' या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता💥

परभणी(दि.03 जुन) :-  जिल्ह्यातील नागरिकांनी  " निसर्ग " या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस कामासाठी घराबाहेर पडू नये तसेच पशुधन, जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

        भारतीय हवामान खात्याच्या सुचनेनुसार " निसर्ग " या चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टी आणि समुद्रकिनाऱ्या लगतच्या बहुतांश जिल्ह्यास बसणार आहे. तसेच या चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील इतरही जिल्ह्यात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तसेच " निसर्ग " या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आलेली आहे.

              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या