💥वारीचे संयोजक गोविंद यादव यांची पत्रकार परिषदेत माहिती 💥
गंगाखेड (दि.२२ जुन) : येथील संत जनाबाई आणि फळा येथील संत मोतीराम महाराज यांच्या पादुका हेलीकॉप्टरद्वारे पंढरपूरला नेण्याची तयारी आता अंतीम टप्प्यात आली आहे. या वारीसाठी लागणारा खर्च ऊचलण्याची तयारी गंगाखेड विधानसभेचे नेते संतोष मुरकुटे यांनी ऊचलली असल्याची माहिती या वारीचे संयोजक गोविंद यादव, मनोहर महाराज केंद्रे यांनी दिली.
या संदर्भात संत जनाबाई मंदिरात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत या वारी मागची भुमिका स्पष्ट करण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारी खंडीत होवू नये. संत जनाबाई आणि संत मोतीराम महाराज यांच्या पादुका पंढरपुरी जाणे, म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक वारकरीच पंढरपूरास गेल्यासारखे असल्याची भावना यावेळी ऊपस्थित महाराजांनी बोलून दाखवल्या. तर ही सेवा करण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे संतोष मुरकुटे यांनी सांगीतले. संत जनाबाई पालखीचे मानकरी शिवाजीराव चौधरी यांनी या निमित्ताने ही वारी खंडीत होत नाही, याबाबत समाधान व्यक्त केले. संयोजक गोविंद यादव, मनोहर महाराज केंद्रे यांनी परवानगी संदर्भाने केलेल्या आणि सुरू असलेल्या कारवाईची माहीती दिली. हेलीकॉप्टरचे येथून ऊड्डाण होईपर्यंत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी ऊपस्थितांनी बोलून दाखवला.
ह. भ. प. विनायक महाराज गुट्टे गुरूजी, ह.भ.प. अच्यूत महाराज किरडे, ह. भ. प. माणिक महाराज शास्त्री, भगवान महाराज ईसादकर, ह. भ. प. बाळू महाराज बहादुरे, ह.भ.प. रामचंद्र महाराज औंढेकर, राजाभाऊ डमरे, माऊली ढेंबरे, नगरसेवक तुकाराम तांदळे, बाळासाहेब राखे, नंदुअप्पा बेलोरे, कुणाल मुरकुटे आदिंची यावेळी ऊपस्थिती होती...
0 टिप्पण्या