🔥 कणखर भुमीका - प्रतिष्ठांचे बुरखे बघता उचकुनी अत्याचारी खुनीदुष्ट सारे.🔥



💥कवी - ॲड.संजय भारदे मुखेड

*कणखर भुमिका*
*करीते खळबळ*
*राही तो अढळ*
*वेळ प्रसंगी.*

हवं असेल पिकं
मारावी लागेल किड
वाढेल तैसा शिडं
दक्षतेने.

*नसेल उंचावत*
*लढावया मान*
*घ्यावं तपासुन*
*डोकं आपलं*.

देता येत असेल
द्यावी प्रेरणा
टाळावे संभ्रमा
आपल्यातूनी.

*दानावर जगणे*
*स्वसन्मान लुळा*
*जन्मभरी खुळा*
*सामर्थ्याविन.*

नासे उकाड्याने
साजुक ते दुध
त्याप्रमाणे क्रोध
स्नेहा नासवी.

*लालची हव्यास*
*नसे समाधान*
*लबाडी उधाण*
*आयुष्य नासे*.

देई साथ कुणा
लबाडी कायम
असा नीती नियम
ठरलेलाच.

*आहे सत्य एक*
*सुर्यासम प्रखर*
*कालगती चक्र*
*लखलखीत.*

स्वत: ज्याचे त्यांने
पहावे तपासून
वाईट दुर्गुण
पाखडोनी.

*प्रेरणादायी ठरेल*
*त्याचे खरे जीवन*
*संस्कृती संवर्धन*
*तया चलनी*.

माझे मीचे कोश
फाडूनिया जगेल
शेजाऱ्यांना बघेल
तोची माणुस.

*सत्य असत्यास*
*असावे प्रमाण सिध्द*
*नसावं मुकं मिंध*
*जीवन मृतं.*

बोलावे चालावे
तोलून प्रमाण नेक
नसावे अनेक
ढोंगी बुरखे.

*वाचाळ बडबड*
*ज्याच्या त्याच्या मुखी*
*प्रतिष्ठित बहुरुपी*
*दिसती चहू*.

प्रतिष्ठांचे बुरखे
बघता उचकुनी
अत्याचारी खुनी
दुष्ट सारे.

ॲड.संजय भारदे मुखेड*
मो.९५४५९०८५६७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या