💥महाराष्ट्र राज्याचे मंत्री युवा सेनाप्रमुख मा.ना.आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसा कौतुकास्पद पध्दतीने साजरा...!



💥नांदेड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतात युवा सेनेने केली पेरणी💥

नांदेड :  युवा सेनेचे प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी खुरगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतात बि-बियाणे, खतासह पेरणी करून दिली.
नांदेड तालुक्यातील खुरगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी रमाकांत लेंंंडाळे यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटूंबियांना दिलासा मिळावा व पेरणीसाठी मदत व्हावी, यासाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी पुढाकार घेत लेंडाळे यांच्या शेतात पेरणी करून दिली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याचे वडील जयराम लेंडाळे, सरपंच संतोष लेंडाळे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख बळवंत तेलंग, शहर प्रमुख नवज्योतसिंग गाडीवाले, उपतालुका प्रमुख संतोष पावडे, प्रल्हाद पावडे, उपशहर प्रमुख अभिजित भालके, विश्वास मोरे, शाखा प्रमुख श्याम लेंडाळे, पुरभाजी जाधव, गजानन लेंडाळे, सोनाजी जाधव, केशव रासे, बाबूराव गुंजकर, रामराव पाटणे, करण इटकर, रवि नागरगोजे, रामा कडेकर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या