💥महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंत राहणार लॉकडाऊन....!💥कोरोना बाधीत रूग्ण अधिक असलेल्या भागात कडक निर्बंध लावले जाणार आहेत💥

मुंबई (२९ जुलै) - राज्यातील अनलॉक १.० दरम्यान मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण वाढले असल्यामुळे आता राज्यात ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन कायम करण्यात आला असून जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण अधिक आहेत तिथे कडक निर्बंध लावले जाणार असल्याचे संकेत शासनाने दिले आहे.


राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर राज्यातील अनेक भागात कोरोना विषाणूंचा वेगाने फैलाव सुरू झाला. राज्याची राजधानी मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जिथं आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता अशा ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक,धुळे,जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.
राज्यात एक जुलैपासून मिशन बिगीन अगेनच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात होणार आहे. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. यानुसार मागच्याच आठवड्यात राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र,३१ जुलै २०२० पर्यंत ज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. त्यात कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही.एकप्रकारे राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवले असे म्हणायला हरकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या