💥पुर्णा तालुक्यातील सारंगी येथे रेती तस्करां विरोधात चुडावा पोलीसांची धाडसी कारवाई....!💥कारवाईत ०४ ट्रेक्टर व ट्रालीसह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त💥 

पूर्णा ( दि.०५ जुन )तालुक्यातील मौ.सारंगी येथील नदी पात्रात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत शासनाचा महसूल बुडवत विना परवाना चोरटी रेती उपसा करणाऱ्या ०४ ट्रेक्टर चालकावर गुन्हा दाखल करत चारही ट्रक्टर व ट्रालीसह अंदाजे १६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची धाडसी कारवाई चुडावा पोलीसांच्या पथकाने केली. 

        सविस्तर वृत्त असे की चुडावा पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलिस उपनिरीक्षण मारोती चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सारंगी नदी पात्रात विना परवाना रेती उपसा अंधाराचा फायदा घेत करत होते मात्र पोलिसांच्या पथकाचा सुगावा लागताच चारही ट्रक्टर चालकाने रेतीने भरलेल्या ट्राल्या रिकाम्या करुन पळुन गेले . त्यात चालक एम एच २२ जे ७२६६ , एम एच २२ एच १०१३ , एम एच २२ ए एम १७६५ . नंबर नसलेले ट्रक्टर अशा चारही चालकावर विविध कलमान्वे चुडावा पोलीस स्थानकात आज शुक्रवार दि.०५ जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारवाईत रेती तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या चारही ट्रक्टर व ट्राली आदी वाहनांची अंदाजे किंमत १६ लाख रुपये आहे.या घटनेचा तपास पो.ना.मारोती सुरेवाड हे करीत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या