💥कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता गुटखा तंबाखू आणि पुड्यांचे सेवन करणाऱ्यांना आवर घाला....!



💥लॉकडाऊन झाले,गुटखा तंबाखू खाणाऱ्यांचे मुखडाऊन केव्हा होणार ? साथरोग अधिनियम कायद्याची उघड पायमल्ली💥

परभणी/पुर्णा[दि.२२ जुन] - कोरोना व्हायरस या जागतिक महामारी ठरलेल्या जिवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह साथरोग अधिनियम १८९७ हा कायदा लागु केला कोरोना व्हायरस अर्थात कोविड - १९ या रोगाचा फैलाव होता कामा नयें याकरिता प्रशासनाने सामाजिक अंतरासह (सोशल डिस्टन्सिंग) व तोंडावर मास्कचा वापर करणे तसेच तंबाखू गुटखा आदींसह तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदीचे सक्तीचे आदेश जारी करून शासनाच्या आदेशाची अवज्ञा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले.परंतु जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्फत जारी केलेल्या आदेशाची स्थानिक पातळीवर प्रशासना कडूनच काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे राज्यात प्रतिबंधीत तंबाखू गुटखा तसेच तंबाखूजन्य गुटखा पुड्यांची मोठ्या प्रमाणात तस्करीसह सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे विक्री होत असल्याने गुटखा तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारे पिंक बहाद्दर गुटखा शोकीन जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांची राजरोसपणे अवज्ञा करतांना पाहावयास दिसत असून सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना नव्हे तर अक्षरशः गुटखा तंबाखूचे सेवन करून ओकतांना दिसत आहेत.

 

पुर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक रस्त्यांवर चौका चौकात तसेच शासकीय कार्यालय शाळा परिसर धार्मिक स्थळांच्या आसपास चालणाऱ्या पानटपऱ्यांसह किराणा दुकानांमध्येही गुटखा पुड्या,तंबाखू पुड्या तसेच बाबा-रत्ना मटरेल खुलेआम विक्री होत असल्यामुळे गुटखा शोकीन गुटखा तंबाखू मटरेलचे सेवन करून जागोजाग थुंकत असल्याने तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याचा प्रचंड धोका निर्माण झाल्याचे दिसत असून प्रशासन मात्र 
साथरोग अधिनियम १८९७ या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यास असमर्थ ठरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यकठोर तसेच कर्तृत्ववान जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी स्थानिक प्रशासनासह पोलीस प्रशासनास सक्तीचे आदेश देऊन गुटखा तंबाखू विक्रेत्यांसह गुटखा तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी जनसामान्यांतून होतांना दिसत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या