💥आधुनिक भारताचे जनकः लोकराजा राजर्षि शाहु महाराज.....!💥त्यांची कारर्किद बहुजनांच्या लोककल्याणासाठी गेली💥

लेखक - कैलास पिराजी पोहरे

*१९ व्या शतकात आधुनिक भारताची जडणघडण करण्यात राजर्षि शाहु महाराजांचा खुप मोठा वाटा आहे. म्हणुनच ते आधुनिक भारताचे व लोकशाहीचे जनक ठरतात.*
         *कोल्हापुर संस्थानात वारस नसल्यामुळे कागलच्या घाडगे घराण्यातील यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेण्यात आला.हाच यशवंत पुढे राजर्षि शाहु महाराज झाले.त्यांची कारर्किद बहुजनांच्या लोककल्याणासाठी गेली.बहुजनांच्या झोपडीत विकासाचा प्रकाश गेला पाहिजे यासाठी हा ज्ञानभास्कर आपलं आयुष्य समर्पित करता झाला.

                 *आज  सन २००० साली केंद्रशासनाने सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा केला तो शंभर वर्षापुर्वी कोल्हापुर संस्थानात शाहु राजांनी लागु केला होता.बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत,शाळेत टिकली पाहिजेत,आणि ते मोठी झाली पाहिजेत हे स्वप्नं शाहुनी साकार केलं.जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना १ रुपया दंड लावला.बहुजनांच्या मुलांसाठी शाळा काढल्या,वस्तीगृहे बांधली.तेली,तांबोळी,मराठा,माळी,धनगर,सनगर,लिंगायत,जैन,सुतार अशी वस्तीगृह काढून सामाजिक शैक्षणिक सहिष्णुता साध्य केली.पुरोहित कार्य विशिष्ठ समाजाची मक्तेदारी राहु नये म्हणुन वैदिक शाळा काढल्या.गोसावी,शिंपी,कोष्टी,जंगम,लिंगायत मुलांना पुजापाठ शिक्षण देवुन पुरोहितांची वैदिक हुकुमशाहीला त्यांनी सुरुंग लावला.*
          *केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक समाजसुधारणाही लोकराजांनी केल्या.विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी विधवा पुनरविवाह,सतीप्रथा बंद,पडदा पध्दतीला विरोध,बहुपत्नीत्वाला विरोध करुन संस्थानात कायदे केले.सामाजिक न्यायासाठी लोक अदालती भरवुन गुन्हेगारास शासन दिले.*
           *सामाजिक आरक्षणाची सुरुवात प्रथम लागु करुन बहुजण पोरांना सामाजिक न्याय मिळवुन दिला.पन्नास टक्के जागा राखिव ठेवल्या.वंचित,दुर्बल,पिचलेल्या,गंजलेल्या समाजास सामाजिक विकासाची संधी उपलब्ध केली.विकासाच्या मुख्यः प्रवाहात सामील करुन घेतले.त्यांना नोकर्‍या दिल्या.*
            *सामाजिक बरोबर धार्मिक सुधारणा केल्या.सत्यशोधक समाज व आर्य समाज यांच्या शाखा कोल्हापुर संस्थानात काढल्या.धार्मिक कर्मकांड,वेदोक्त पुजापाठ,यज्ञ,बळी,अंधश्रध्दा याला कडाडुन विरोध केला.देव आणि भक्त यांच्या मधला "दलाल पुरोहित" ही व्यवस्थाच त्यांनी नष्ट केली.बहुजनांची लग्न,अत्यंसंस्कार हे गोसावी,जंगम समाजाकडुन करुन घ्यावे असा आदेश काढला.*
           *काही अर्थिक,भौतिक सुधारणा संस्थानात करायला सुरुवात केली.उद्योगास चालना दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही म्हणुन मोठे उद्योग सुरु केले.कारखानदारीस चालना दिली.सुतगिरण्या,तेलगिरण्या,कापड उद्योग,मसाला,धातु उद्योग,इ.कारखाने निर्माण केले."राधानगरी" धरण बांधुन स्वतंत्र पाटबंधारे ,जलसंपदा खाते निर्माण केले.शेततलाव,तळी,बंधारे बांधून जमिनी आणि संस्थान सिंचनाखाली आणले.पर्यावरणाची काळजी घेतली.*
       *कला व कलाकारांना पुरस्कार दिले.कुस्त्यांचे फड उभा केले.गायन,हस्तकला,संगित,वादन,शिल्पकला,वास्तुकला यांची पुनर् बांधणी केली.कलाकारानां सन्मानाने जगण्यासाठी विशेष भत्ते दिले.कला जीवंत राहिल्या पाहिजे म्हणुन अनुदान आणि कला संस्था उभा केल्या.आजपण कुस्त्यांचे माहेरघर म्हणुन कोल्हापुर संस्थानाची ओळख आहे.ही कृपा शाहु राजांची होती.*
            *कोहिनुर हिरा खुप प्रसिध्द आहे.हा हिरा कोल्हापुर संस्थानास सापडला,तो हिरा म्हणजे सामाजिक आरक्षणाचे जनक लोककल्याण कारी राजर्षी शाहु महाराज होय.आणि त्यांनीच 1920 च्या माणगाव येथील बहिष्कृत हितकारीणी परिषदेत  त्या सभेचे अध्यक्ष विश्व भूषन डॉ. बाबासाहेब हेच तुमचे वगरे मार्गदर्शक आणि उद्धारक ठरतील अशी भविष्यवाणी केली होती.या परिषदे पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली.महाराजांनी नागपूर येथे भरलेल्या sheduld cast परिषदेचे अध्यक्ष पद भूषविले होते.अस्पृश्य समाजातील एक विध्यार्थी दःझवी ची परीक्षा पासून झाला आहे ही बातमी त्यांना कळल्यावर आपल्या शिपायाना त्याचा शोध घेण्यासाठी मुंबईला पाठवले... त्यांना त्या विधार्थ्याचा शोध लागला  नाही तेव्हा महाराज स्वतः मुंबईला शोध घेण्यासाठी गेले. आणि थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या चाळीत राहत होते तिथे गेले,त्याच्या थेट घरात गेले.असे गुणग्राहक होते.आपल्या राज्यातील जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ते वेषांतर करून राज्यातील आपल्या प्रशासन आणि अधिकारी कासे वागतात याची परीक्षा घेत असत.'आंबोळी शेत' सामान्य गरीब कुटूंबातील शेतकरी बाईच्या गटाची आंबोळी पोटभर खाल्ली... खाता खाता त्यांचा परिस्थितीची विचारपूस केली... आणि उद्या राजवाड्यात बोलावून लुगडे चोळी आणी काहीच जमीन आपल्या मानलेल्या बहिणीसाठी नावे करून देण्याचा आदेश काढला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वृत्तपत्र चालवण्यासाथी आर्थिक मदत आणि विदेशात शिक्षण घेण्यासाठी जाताना एकदा 2500 रुपये सर्ह्दय आर्थिक मदत करून त्याच्या पत्नी रमाबाई मबेडकर याना त्यांनी बहिण मानले होते.अस्पृश्य समाजातील गंगाराम कांबळे याला महाराज विदेश वारीला गेले होते तेव्हा स्पर्श करील म्हणून उच्च वर्णीय लोकांनी चाबकाने फोडून काढले होते. ही बातमी महाराजांना कळली.... महाराजांनी त्याचा गंगाराम ला कोल्हापूर च्या चौकात हॉटेल टाकून दिले.महाराष्ट्रातील एका अस्पृश्य व्यक्तीचे पहिले हॉटेल... पण एकही ग्राहक हॉटेल मध्ये जात नव्हते.... तेव्हा महाराज आपल्याला अधिकारी वर्गासह त्या हॉटेल मध्ये गेले आणि सर्वांसाठी चहा मागवला.... आणि नंतर आठवड्यात एक भेट देऊ लागले.त्या मुळे गंगाराम कांबळे चे हॉटेल लवकरच प्रसिद्ध झाले... त्यांना भविष पाहणे आवडत नसे.जातपात मनात नसत आपल्याला विधवा सुनेचा दुसऱ्यांदा जातिबाह्य होळकर घराण्यात करून दिला.असे कर्ते समाज सुधारक, विज्ञानवादी,गुणांची कदर करणारे,कुस्ती या खेळाचा आदर्श करणारे ते स्वतः एक उत्कृष्ट मल्ल होते. म्हणून असे म्हणावे लागेल की,या भारत भूमीत स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्रोतर कालखंडात असंख्य राजे होऊन गेले... पण आज त्यांचे नावही कुणाला माहिती नाही.पण छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,मुघल सम्राट अकबर,टिपू सुलतान,राजा कृष्ण देवराय विजयनगर,  बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर चे छत्रपती शाहू महाराज भोसले हे खऱ्या अर्थाने लोकराजे ठरले.शाहू महाराज राजा असूनही एका ऋषीं सारखे राहिले म्हणून त्यांना "राजर्षी" असे म्हणतात त्यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त अर्थात 'सामाजिक न्याय दिनानिमित्त' विनम्र अभिवादन*
   *स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय यांची कोल्हापुर संस्थानात सुरुवात करणार्‍या या लोककल्याण कारी भिष्मपितामहास त्रिवार वंदन.*
    👏👏🌹🌹🌹👏👏

    *आपलाच स्नेहांकित*
====================
*कैलास पिराजी पोहरे*
*प्राथमिक शिक्षक*
*जि.प.के.प्रा.शाळा निळा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या