💥नांदेड येथील जुना मोंढा ते महाविर चौक हा रस्ता तब्बल सत्तर दिवसानंतर उघडण्यात आला...!



💥जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी या भागाची पाहणी करून आज शुक्रवार दि.१२ रोजी घेतला हा निर्णय घेतला💥

नांदेड(दि.१२ जुन) - जवळपास 70 दिवसांपासून बंद असलेला जुना मोंढा ते महाविर चौक हा रस्ता आज उघडण्यात आला. यामुळे अनेक वाहतुकीच्या अडचणी कमी होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी या भागाची पाहणी करून आज हा निर्णय घेतला.


जवळपास 70 दिवसांपेक्षा जास्त काळापासून महाविर चौक ते जुना मोंढा हा रस्ता वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद होता. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर महाविर चौक ते तारासिंह मार्केट आणि जुना मोंढा ते बालाजी मंदिर या भागापुरता हा रस्ता उघडण्यात आला होता. हा रस्ता पुर्णपणे सुरू व्हावा यासाठी अनेक जण मागणी करत होते. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमात असलेल्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन हे मात्र या रस्त्याला उघडण्यासाठी तयार नव्हते. या भागात सापडलेल्या शेवटच्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांचा कार्यकाळ आता जवळपास 28 दिवस होत आला आहे. त्या आधारावर हा रस्ता उघडण्याचा निर्णय झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या