💥महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर...!



💥सुधारित वेळा पत्रकानुसार १३ सप्टेंबर-११ अॉक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२० रोजी होणार परिक्षा💥

परभणी (दि.१७ जुन)राज्यात कोरोना व्हायरस कोविड-१९ या जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने माहे एप्रिल व मे २०२० मध्ये आयोजीत एकूण ३ परीक्षा सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलल्या होत्या. 
आता लोकसेवा आयोगाने या तिन्ही परीक्षांबाबत सुधारीत वेळापत्रक आज बुधवार दि.१७ जुन रोजी दुपारी जाहीर केले आहे.

लोकसेवा आयोगाने घोषित केलेल्या वेळापत्रका नुसार राज्यसेवा पुर्व परीक्षा २०२० दि.१३ सप्टेंबर रोजी,महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा दि.११ ऑक्टोबर रोजी व महाराष्ट्र अभियांत्रीकी सेवापुर्व परीक्षा दि.१  नोव्हेंबर रोजी घेली जाणार आहे.
दरम्यान, लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेवून परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी फेरआढावा ही घेतला जाईल,असे लोकसेवा आयोगाच्या सहसचिवानी म्हटले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या