💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधीत आणखी ३ जनांना सुट्टी...!



💥जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित कक्षात ११ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत💥

परभणी (दि.११ जुन)-कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणाऱ्या  आणखीन ३ रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने आज गुरूवार दि.११ जुन रोजी सुट्टी दिली. 

रुग्णालयातून सुट्टी दिलेल्या कोरोना बाधीत ३ रुग्णात परभणीतील मातोश्री नगर व इटलापूर मोहल्लातील प्रत्येकी एक आणि गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित कक्षात ११ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या