💥औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात २९ कैदी कोरोना बाधीत...?💥लाॅकडाऊन सुरु असतांना कारागृहात कोरोना बाधीत रुग्ण आढळतोच कसा ? जिल्हा प्रशासनही प्रश्नार्थक मुद्रेत💥  

औरंगाबाद (०६ जुन) येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात तब्बल २९ कैद्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती तुरुंग उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांनी आहे.
हर्सूल कारागृहात मागील तिन आठवड्यांपूर्वी एक कैदी कोरोना पाॅझिटिव्ह आढळला होता. 

हर्सूल कारागृहाचे तुरुंग अधिक्षक हिरालाल जाधव यांनी त्यावेळी याबाबत आमचा कोणीही कैदी कोरोना पाॅझिटिव्ह नसल्याचे माध्यमांना खोटे सांगितले होते.त्यानंतर हर्सूल कारागृहात रुग्णांची संख्या वाढंत गेली. लाॅकडाऊन सुरु असतांना कारागृहात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कसा आढळतो याबाबत जिल्हाप्रशासनानेही बोलणे टाळले होते.त्याचवेळी अप्परपोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी या बाबत आपण चौकशी करु असे स्पष्टीकरण दिले होते.पण त्यानंतर या चौकशीबाबत काय झाले याचा खुलासा अद्यापही झाला नसल्याचे निदर्शनास येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या