💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातील २ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त.....!💥दुबईहून परतलेला व मध्यवस्तीतील मंगळवारा भागात वास्तव्यास असणारा व्यक्ती क्वारंटाईन💥

परभणी (दि.१४ जुन) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातील कोरोनाबाधित २ रुग्ण आज रविवार दि.१४ जुन रोजी कोरोनामुक्त झाले आहेत.परंतू त्यांच्यावर अन्य आजाराबाबत उपचार सुरू असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना सुट्टी दिलेली नाही.जिल्हा शासकीय रुग्णालयात आज रविवारी संशयित म्हणून ८ व्यक्ती दाखल झाल्या. त्यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वॅब घेवून तात्काळ नांदेड येथील प्रयोगशाळेकडे तपासणी साठी पाठवले त्या आठही व्यक्तींना संशयितांच्या कक्षात दाखल करून घेतल्या गेले.

त्यामुळे त्या कक्षात आज रविवारी सायं.०६-०० वाजेपर्यंत एकूण ३८ रुग्ण दाखल आहेत.त्यात परभणी तालुक्यातील पेडगाव येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील तिघांचा समावेश आहे. त्या तिघांचेही स्वॅब रुग्णालय प्रशासनाने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.
दरम्यान मध्यवस्तीतील मंगळवारा भागात  वास्तव्यास असणाऱ्या व दुबई येथून परतलेल्या एका व्यक्तीचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्वॅब घेवून त्या व्यक्तीस क्वारंटाईन केले असल्याची माहिती रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकारी यांनी दिली...
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या