💥परभणीतील वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांत एका ई-टेंडर प्रकरणातून कंञाटदार व समर्थकांचा धुमाकूळ..!💥आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु असतांना तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार पोलीस अधिक्षकांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष💥

परभणी (दि.२४ जुन) - एका ई टेंडरच्या प्रकरणातून काही कंञाटदार व समर्थकांनी परभणी येथिल वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांत दिवसा ढवळ्या राडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे. 
            वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन दुग्धशाञ विभागात बुधवारी २४ रोजी  दुपारी १२:३० वाजण्याच्या  सुमारास अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी करून मोठा राडा केला.यावेळी कार्यालयातील खुर्च्या,टेबल, फर्निचरसह काचेच्या तावदानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.हा धुडगूस पंधरा ते वीस मिनिटे सुरू होता.
हा प्रकार सुरू असताना समाजकंटकांना आडवण्याचा कोणीही प्रतिकार केला नाही.ही बाब पासुन तेथील उपस्थित अधिकारी व कर्मचारीही हादरले होते.सदरील प्रकरण हे एका ई टेंडरच्या प्रकरणातून घडले असुन त्यातुनच काही कंञाटदार व समर्थकांनी हा राडा केला असल्याचे विद्यापिठाच्या सुत्रांनी सांगितले आहे.हा राडा झाल्याची खबर  मोंढा पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलिस पोहचले परंतु तोपर्यंत दे राडेखोर पसार झाले होते.याप्रकरणी दुपारी २ नंतर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे..
------------------------------------------------------------------


सर्वत्र कोरोनामुळे राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू असुन एक प्रकारे शासकीय कार्यालयात धुडगूस घालुन तोडफोड करणाऱ्या विरोधात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या