💥पालम तालुक्यातील पिंपळगाव वाणी येथे एसडीएम सुधीर पाटील यांची रेती तस्करांच्या विरोधात धाडसी कारवाई...!


💥गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करतांना ३ ट्रॅक्टर घेतले ताब्यात💥

परभणी/पालम-(दि.१० जुन) जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या मौ.पिंपळगाव वाणी येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूचे उत्खनन करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात धडक मोहीम राबवत ३ ट्रॅक्टर ताब्यात घेण्याची कारवाई गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आज बुधवार दि.१० जुन रोजी भल्या पाहाटे ०४-०० वाजेच्या सुमारास केल्याने वाळू माफियांचे धाबे दनाणले आहे.

उपविभागीय अधिकारी पाटील यांनी या कारवाईत जप्त केलेले ३ ट्रॅक्टर अनुक्रमे शिवसाम सोनटक्के,नागेश सोनटक्के व मेहमूद पठाण यांचे असून तिनही ट्रॅक्टर पुढील कारवाईस्तव पालम तहसिल कार्यालयात लावण्यात आल्याचे समजते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या