💥शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करणार - सभापती मिराताई टेंगसे
पाथरी (१२ जुन) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शेतकरी पेरणी साठीची तयारी करत असतांना पाथरी शहरातील व्यापारी खतांची कृत्रिम टंचाई करत ज्यादा दर आकारून खतांची विक्री करत असल्याची तक्रार शेतकरी आणि भाकपच्या वतीन उपविभागिय अधिकारी आणि तहसिलदारांना निवेदना व्दारे करण्यात आली आहे.
या वर्षी मान्सून पुर्व दमदार सरी पडल्याने शेतकरी,बी बियाने,खते खरेदी करत आहेत अशा स्थितीत शहरातील कृषी दुकानदार युरीयाची कृत्रिम टंचाई दाखवत ज्यादा दराने विक्री करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याची तक्रार रणजित भाले पाटी,सुर्यकांत नंदकिशोर नाईक आणि भाकपाच्या वतीने कॉ न्यानेश्वर काळे,कॉ अंगद गोरे यांनी उपविभागिय अधिकारी आणि पाथरी तहसिलदारांना निवेदना व्दारे केली आहे.यात म्हटले आहे की शहरातील कृषी दुकानदारांची अनाधिकृत अनेक गोदामे असून यात बी बियांनां सह खते,औषधी भरून ठेवण्यात आलेली आहेत. अशा अनाधिकृत गोदामांचा शोध घेऊन शेतक-यांना खते उपलब्ध करून द्यावीत आणि खतांचा काळा बाजार करणा-यांवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा या विरोधात तिव्र आंदोलन करावे लागेल.
💥निदर्शनास आल्यास परवाना रद्द करणार-सभापती मिराताई टेंगसे
या विषयी जि प च्या कृषी सभापती सौ मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी कृषी दुकानदारांना सज्जड दम दिला असून खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असतांना त्याची टंचाई दाखवली जात असेल तर ही गोष्ट गंभिर असून अशांवर कठोर कार्यवाही करत परवाना रद्द करणार असा दम दिला आहे.
💥दुकानदारांच्या नावानिशी तक्रार करा त्वरीत कार्यवाही करू-सभापती थोरात
खरीप हंगाम सुरू होताच आपण या विषयी अधिका-यांना सुचना करून शेतक-यांना खते,बी बियाने,औषधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहेत. बी बियाणे आणि खतांचा काळा बाजार होत असेल तर संबंधित दुकानदाराच्या नावे थेट आपणाकडे शेतक-यांनी तक्रार करावी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती पाथरी पं सच्या सभापती सौ कल्पना सदाशिवराव थोरात यांनी तेजन्यूज शी बोलतांना सांगितले
0 टिप्पण्या