💥परभणीत अज्ञात समाजकंठका कडून दुचाकी जाळण्याची तब्बल पाचवी घटना...!💥त्रिमूर्ती नगरात वाहन जाळण्याची गेल्या काही महिन्यातील पाचवी घटना💥 

परभणी (दि.२२ जुन) - शहरातील त्रिमुर्ती नगर भागात मागील काही महिण्यापासून सातत्याने अज्ञात विकृत मनोवृत्तीच्या समाजकंठका कडून दुचाकी वाहन जाळण्याचे प्रकार घडत असून अशीच एक घटना आज मंगळवार दि.२३ जुन रोजी पहाटे ०२-४५ वाजेच्या सुमारास जिंतुर रस्त्यावरी त्रिमुुर्तीनगर भागात घडली एका अज्ञात विकृत मनोवृत्तीच्या समाजकंठकाने एक मोटारसायकल पेटवून दिली. 

या घटनेत मोटारसायकल संपूर्णपणे जळून खाक झाली. त्रिमुर्ती नगर भागात रमेश पटवी यांचे निवासस्थान असून त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून विलास जैन हे राहतात. त्यांचीच होंडा युनिकॉर्न ही एम.एच.22-एजी-5314 क्रमाकांची दुचाकी गाडी निवासस्थानासमोर उभी असतांना अज्ञात व्यक्तीने आज मंगळवारी पहाटे त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिली. त्यात ती मोटारसायकल जळून खाक झाली. याप्रकरणाबाबत संबंंधीतांनी नानलपेठ पोलिस स्थानकात धाव घेतली. दरम्यान, त्रिमूर्ती नगरात दुचाकी जाळण्याची गेल्या काही महिन्यातील पाचवी घटना आहे. लागोपाठच्या या प्रकाराने या भागातील नागरिक अस्वस्थ झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपुर्वीच या भागातील दोन-चार चारचाकी वाहनांचीही अज्ञात व्यक्तीनी मोडतोड केली. त्यात घटनेतील ही आरोपी अद्यापपर्यंत पोलिसांना सापडले नाहीत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या