💥पुणे मनपातील कोरोना मुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख विम्यासह वारसा हक्का प्रमाणे नौकरी द्या..!


💥अखिल भारतीय वाल्मीकी महापंचायत युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या वतीने सुमित चावरे यांनी केली मागणी💥

 परभणी/पुर्णा (दि.१५ जुन) पुणे महानगर पालीकेतील स्वच्छता विभागात कर्तव्य बजावतांना कोरोना व्हायरस या जागतिक महामारीची लागण होऊन मृत पावलेल्या कोरोना योध्द्यांना ५० लाख रुपयांचे आर्थिक अनुदानासह त्यांच्या वारसांना वारसा हक्का प्रमाणे नौकरी देण्यात यावी अशी मागणी आज सोमवार दि.१५ जुन रोजी एका लेखी निवेदनाद्वारे पुर्णेच्या तहसिलदार मस्के यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अखिल भारतीय वाल्मीकी महापंचायत युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या वतीने संघटनेचे नेते सुमीत चावरे व विजय सौदा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.


मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात अखिल भारतीय वाल्मीकी महापंचायत युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश या संघटनेने असे नमूद केले आहे की पुणे महानगरपालिका मधील सफाई कर्मचारी श्रीमती शोभा पाटोळे,श्रीमती उमा पाटोळे,श्रीमती रंजना चव्हाण, श्रीमती शकुंतला सालुनकर श्रीमती नंदा साठे या चार महिला सफाई कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचे कोरोना महामारीची लागन होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या चार महिला सफाई कर्मचारी यांना शासकीय निर्णया प्रमाणे प्रत्येकी ५० लाख रुपये विमा संरक्षण अनुदान व त्यांच्या पाल्यांना वारसा हक्क प्रमाणे नोकरी देण्यात यावी व या कुटुंबाचें पुनर्वसन करण्यात यावे असे ही निवेदनात नमूद करण्यात आहे असून तहसिलदारांना दिलेल्या निवेदनावर सुमित चावरे,विजय सौदा,नामदेव गायकवाड,कपिल गायकवाड यांच्या स्वाक्षरी आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या