💥पालम तालुक्यातल्या रावराजूर येथे वाळू तस्करां विरोधात एसडीएम पाटील यांची धाडसी कारवाई...!💥धाडसी कारवाईत २ ट्रॅक्टर वाळूसह घेतले ताब्यात💥

परभणी(१२ जुन) जिल्ह्यातील गंगाखेडचे महसूल विभागाचे  उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी अवैध वाळू उत्खनन व वाळू तस्करी विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून त्यांनी राबवलेल्या या धाडसी मोहिमेमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.या मोहिमे अंतर्गत आज शुक्रवार दि.१२ जुन रोजी सकाळी ०८-३० वाजेच्या सुमारास गोदावरी पात्रातून अवैध उत्खनन करून या चोरट्या वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात जबरदस्त धडक कारवाई केली.


गंगाखेड महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी पाटील हे भल्या पहाटेच्या सुमारास गंगाखेड येथून पालम तालुक्यातील रावराजुर कडे निघाले यावेळी त्यांच्या सोबत फक्त त्यांचे वाहन चालक भालेराव हे होते यावेळी त्यांना अशी माहिती मिळाली होती की वाळू माफिया वाहन रेतीचा साठा घेऊन येत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये धाड टाकण्याचा त्यांनी यावेळी निर्णय घेतला आणि लगेच रावराजुर गाव गाठले यावेळी नदीच्या काठावर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला परंतु पावसामुळे आणि चिखलामुळे त्यांचे वाहन तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते मात्र त्यांना दोन ट्रॅक्टर वाळू घेऊन येत असल्याचे दिसले त्यांना तात्काळ धडक कारवाई करीत २ ट्रॅक्टर वाळूसह ताब्यात घेऊन पालम तहसिल कार्यालयात लावण्याची कारवाई केली...
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या