💥'कायम विना-अनुदानित'वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन...!



💥दिनांक 19 जुन 2020 पासून धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केले जाणार आहे💥

राज्यातील 'कायम विना-अनुदानित' (कला, विज्ञान व वाणिज्य)वरिष्ठ महाविद्यालयाचे दिनांक 19/06/ 2020 पासून धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केले जाणार आहे. असे 'कायम विना-अनुदानित वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटने'चे राज्य अध्यक्ष प्रा.संजय जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने सन 2001 पासून राज्याच्या पवित्र शिक्षणव्यवस्थेत 'कायम विना-अनुदान' हे जाचक व अन्यायकारक धोरण राबवून शिक्षणव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांप्रमाणे आम्हालाही अनुदान मिळेल. या अपेक्षेपोटी राज्यातील नेट-सेट एचडी धारक प्राध्यापक व कर्मचारी वर्ग हा गेली वीस वर्षांपासून विनावेतन अध्यापन करीत आहे.महाराष्ट्र शासनाचे 50 टक्के अनुदान मिळाले तर 50 टक्के अनुदान युजीसी देणार आहे.


त्यामुळे राज्याने वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देणे फारसे अवघड नाही.राज्याच्या मंत्रिमंडळात आमचे सहा शिक्षक प्रतिनिधी असून देखील आमच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही.अशी खंतही त्यांनी व्यक्त केलेली आहे.आज या जागतिक महामारीमुळे तर या वर्गावर खूप मोठे संकट ओढवले आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नसल्यामुळे घरी बसून शासनाच्या नियमांचे पालन करीत संघटना 19 जून पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन छेडणार आहे. जोपर्यंत आमचचा 'कायम'शब्द काढून प्रचलित नियमानुसार टप्प्याटप्प्याने का असेना परंतु अनुदान घोषित करून त्याचा शासनादेश निघणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील अशी माहिती राज्यअध्यक्ष संजय जाधव विभागीय अध्यक्ष डॉ. उस्मान गणी,नांदेड  जिल्हाध्यक्ष प्रा.बाबासाहेब भुक्‍तरे परभणी जिल्हाध्यक्ष प्रा.सय्यद वाजिद यांनी दिली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या