💥परभणी जिल्ह्यातील ९ संशयीत कोरोना बाधीतांना कोरोना मुक्त झाल्याने...!💥कोरोना बाधीत १६ जणांवर उपचार सुरू,आज पुन्हा ११ संशयीत रुग्ण दाखल💥

परभणी (दि.०९ जुन) - परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय पाथरी येथून कोरोनामुक्त ९ जणांना कोरोनाची कुठलेही लक्षणे नसल्याने,त्यांची प्रकृत्ती ठणठणीत असल्याने तसेच राज्यस्तरावरून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधीतांना रुग्णालयातून आज मंगळवार दि.९ जुन रोजी सुट्टी देण्यात आली.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज मंगळवारी सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत एकूण ११ संशयीत दाखल झाले असून जिल्ह्यात आता संशयितांची संख्या २४९४ पर्यंत पोचली आहे.
जिल्ह्यातील ६६ संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत.
जिल्ह्यात एकूण २६८५ पैकी २४११ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ९१ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ८० संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. ३७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण ६६ स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून मंगळवारी एकूण ११ जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. मंगळवारी प्राप्त झालेल्या स्वॅब अहवाला पैकी २१ निगेटीव्ह तर २ व्यक्तींचा अहवाल पॉझीटीव्ह आला. जिल्हा शासकीय रूग्णालयात मंगळवारपर्यंत विलगिकरण कक्षात ३१३, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात ८८ जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले २०९३ जण आहेत. बरे होवून सुट्टी झालेले ७२ रुग्ण आहेत. ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून संक्रमीत कक्षात १६ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
मंगळवारी सुट्टी झालेल्यामध्ये परभणी शहरातील मातोश्री नगर, शास्त्री नगर, मिलिंद नगर येथील प्रत्येकी एक, पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील तीन, जिंतूर शहरातील नुरानी मशिद येथील एक, मानवत शहरातील एकता नगरातील एक, पाथरी तालुक्यातील रामपुरी येथील एका महिला अशा ९ जणांचा समावेश आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या