💥अर गणप्या तुला नाय जमायच..र..अर तु सरपंच झाला तर सतरंज्या कोण उचलणार झेंडे कोण लावणार हाय ?
💥लघू कथा - 'कारभारी अन् ढाण्या वाघ'✍️

✍️ - रणजीत सी.(चौधरी दिनेश)

👨🏻‍🦰गणप्या - कारभारी निवडणूक आलीया निवडणूकीची तय्यारी झाली ना बर..

👳‍♀️कारभारी - अर..गणप्या तय्यारी कसली ..र ? पसतीस वर्षापासन आपलच राज्य हाय की गावच्या ग्रामपंचायतीवर...

👨🏻‍🦰गणप्या - अहो कारभारी अगोदर आबा...नंतर तात्या...त्या नंतर बाबा...त्या नंतर माय अन त्यांच्या नंतर तुमी कारभार सांबाळला होता अहो मागल्या निवडणूकीत सरपंचपद महिला राखीव झाल अन् वहीनी साहेब सरपंच झाल्यात..

👳‍♀️कारभारी - अर.. गणप्या तुह्या वहिनी साहेबाला काय कळतया ? सांभाळला की कारभार म्याच...

👨🏻‍🦰गणप्या - अहो कारभारी पण यावेळसबी सरपंच पद राखीवच हाय की आता काय करायच..

👳‍♀️कारभारी - अर..गणप्या कारभारी म्हणत्यात गावची लोक मला..अर करूत निवडणूकीत एखाद गावच 'गाढव' उभ..अर लोकबी म्हणत्याल कारभाऱ्यान 'गाढवावर' बसून गावचा कारभार चालवलाय..आ....हा...हा...हा....

👨🏻‍🦰गणप्या - अहो मालक म्या हाय की ? म्या काय तुमच्या पुढ जाणार हाय व्हय ?

👳‍♀️कारभारी - अर गणप्या तुला नाय जमायच..र..अर तु सरपंच झाला तर सतरंज्या कोण उचलणार झेंडे कोण लावणार हाय ? अर पोल चिठ्ठ्या कोण वाटणार हाय ? दळण-बाजार आणन-चिंट्या-पिंट्याल शाळात नेण घरची काम समदा कारभार तुह्यावरच हाय की अर तु तर मया घरचा राखनकरता ढाण्या वाघ हायस ...

✍️लघुकथा लेखक - रणजीत सी.(चौधरी दिनेश)टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या