💥वाशिम जिल्ह्यात आणखी १५ व्यक्तींचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ सध्या ३५ रुग्न अॅक्टीव्ह...!💥मुंबई येथून खेर्डा ता.मालेगाव येथे आलेल्या महिलेचा अहवालही ‘पॉझिटिव्ह’ आला आहे💥

वाशिम-निमजगा, वाशिम येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १० जणांचे अहवाल आज ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. यामध्ये २८, ४५ व ३५ वर्षीय महिला, १३ व १६ वर्षीय युवती, २० वर्षीय युवक, १० व ४ वर्षीय मुली आणि १० व ६ वर्षीय मुलांचा समावेश आहे.

दिल्ली येथून आलेल्या एकता नगर, रिसोड येथील ४१ वर्षीय व्यक्तीला सुद्धा #कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच रिसोड तालुक्यातील कन्हेरी येथील एका ६० वर्षीय महिलेचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. सदर महिला मुंबई येथून आली आहे.

मुंबई येथून भेरा (ता. मालेगाव) येथे आलेल्या अनुक्रमे २८ व २३ वर्षीय पती-पत्नीचे अहवालही ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. तसेच मुंबई येथून खेर्डा (ता. मालेगाव) येथे आलेल्या महिलेचा अहवालही ‘पॉझिटिव्ह’ आला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या