💥परळीत रेल्वे तिकीटे रद्द करण्यासाठी आरक्षण काऊंटर सुरू...!💥काऊंटर दररोज सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे💥

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)-सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना त्यांची आरक्षित तिकिटे रद्द करता यावीत यासाठी येथील रेल्वे स्थानकात शनिवार पासून आरक्षण काऊंटर पूर्ववत सुरू करण्यात आले आहे.

याबाबत रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे अनेक नियोजित गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाशांनी यापूर्वीच त्यांची तिकिटे आरक्षित केली आहेत, त्यांना सदरील तिकिटे रद्द करता यावीत यासाठी येथील रेल्वे स्थानकात काल पासून आरक्षण काऊंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
हे काऊंटर दररोज सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तरी प्रवाशांनी हया काऊंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक संपर्कासाठी रेल्वेचे संपर्क अधिकारी अरविंद कुमार परळी स्टेशन परळी यांच्याशी करावा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या