💥परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील दोन मुलींचा अहवाल आला पॉझिटिव्ह...!💥गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा,खबरदारी घ्या जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी नागरिकांना केले आवाहन💥 

परभणी (दि.२४ जुन) - जिल्ह्यात आजपर्यंत   कोरोना विषाणू प्रादुर्भावाची संख्या मर्यादित जरी राहिली असली तरी आज मंगळवार दि.२३ जुन रोजी सकाळी जिल्हा प्रशासनाला तब्बल २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील २ मुली पॉझिटिव्ह आढळून आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी सांगितले जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःची  काळजी घेतली पाहिजे प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले

संसर्गजन्य आजाराची लागण या जिल्ह्यात होते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे जिल्ह्यात एकूण ९६ रुग्ण संख्या होती ती आता ९८ पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे प्रत्येकाने आपापली काळजी आणि खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या