💥नांदेड मध्ये दिवसभरात आढळले ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.....!💥जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रग्णांची संख्या ३७१ एवढी झाली आहे💥

नांदेड (दि.२९ जुन) - नांदेडला आज सोमवार दि.२९ जून रोजी सायंकाळी ०५-०० वाजता आलेल्या अहवालात कोरोनाचे ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रग्णांची संख्या ३७१ एवढी झाली आहे. त्याचबरोबर आज सोमवारी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 
नांदेडला सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या एकूण ८६ अहवालांपैकी ७९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच चार अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७१ एवढी झाली आहे. 


💥नांदेडचे तीन तर मुखेडचा एक रुग्ण💥

सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या चार जणांमध्ये देगलूर नाका येथील एक पुरूष (वय ५५), नांदेडच्या नवीन कौठा येथील एक पुरुष (वय ५३), बाफना परिसरातील एक महिला (वय ६०) आणि मुखेड येथील एक पुरुष (वय ५५) यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

💥२८१ रुग्ण कोरोनामुक्त💥

दरम्यान, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोमवारी सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २८१ एवढी झाली आहे. तसेच सोमवारी (ता. २९) ११७ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल मंगळवारी (ता. ३०) सायंकाळपर्यंत प्राप्त होतील.


💥सहा जणांची प्रकृती गंभीर💥

सध्या ७४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्याच दोन महिला (वय ५० व ५५) आणि चार पुरूष (वय ३८,४२, ६७ आणि ७५) यांचा समावेश आहे. ७४ रुग्णांपैकी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २० रुग्ण, पंजाब भवन कोविड केअर सेंटरला ४४ रुग्ण, मुखेड कोविड केअर सेंटरला एक, देगलूर कोविड केअर सेंटरला एक रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच सात रुग्ण औरंगाबादला आणि एक रुग्ण सोलापूरला संदर्भित करण्यात आले आहेत. 

  💥जिल्ह्याची कोरोनाविषयी संक्षीप्त माहिती💥

सर्वेक्षण - एक लाख ४६ हजार ६८१
घेतलेले स्वॅब- सहा हजार ३३५
निगेटिव्ह स्वॅब- पाच हजार ४६९
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- चार
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - ३७१
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - तीन
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - निरंक,
मृत्यू संख्या - १६
रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या - २८१
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ७४
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ११७

💥मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा💥

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या