💥बिड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातल्या मोरवड येथील दुर्दैवी घटना शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या दोन लेकरांवर काळाची झडप...!


💥दुर्दैव शेतकऱ्यांच्या लेकरांचं,विज पडून भावा-बहिणीचा मृत्यू...भावपूर्ण श्रद्धांजली

बीड/आई-वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहीण-भावाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्य़ातील #वडवणी तालुक्यातील #मोरवड येथे शुक्रवारी (ता. १२) घडली.


गुरुवारी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेतात पेरणी व कापूस लागवड सुरू आहे, त्यामुळे शुक्रवारी मोरवड येथील विष्णू अंडील यांच्या शेतात कापूस लागवड सुरू होती, यामध्ये विष्णू अंडील यांचा मुलगा व मुलगी कामात मदत करत होते.

दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाल्याने आई-वडील व हे दोघे बहीणभाऊ निवाऱ्यासाठी झाडाच्या खाली थांबले होते. त्या झाडावर अचानक वीज कोसळल्याने अशोक विष्णू अंडील (वय १७) व पूजा विष्णू अंडील (वय १५) यांच्या होरपळून जागीच मृत्यू झाला. अशोक हा पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, तर मुलगी पूजा गावातीलच विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती. मुलगा कोरोनामुळे गावी आला होता मात्र त्याच्यावर काळाने घाव घातल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या