💥परभणी जिल्ह्यातील जुगारड्यांच्या हद्दपारीला हिरवा कंदील...!💥जिह्यातून जुगारड्यांना हद्दपार करण्याचा जिल्हा पोलिस अधीक्षकांचा इशाराः कारवाई सुरू💥

परभणी(दि.03 जुन)-जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांनी जिल्ह्यातील जुगारड्यांच्या हद्दपारीला हिरवा कंदील दाखवला असून जिल्ह्यात ज्या व्यक्ती वारंवार जुगार खेळतांना आढळून येतील अश्या जुगारड्यांच्या गुन्ह्याचे रेकार्ड तयार करून त्यांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई केली जाईल,असा धडक इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिला आहे.


जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर २४ मार्च ते ३१ मे २०२० दरम्यान विविध पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाच्या माध्यमातून जुगार खेळणाऱ्या व्यक्ती विरूध्द छापे टाकून ५७ गुन्हे दाखल केल्या गेले. त्यात ३६६ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली. या जुगारड्यांकडून २५ लाख ९६ हजार ६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,असे पोलिस अधीक्षक उपाध्याय यांनी म्हटले असून ज्या व्यक्ती वारंवार जुगार खेळतांना आढळून आल्या अशा पाच गुन्ह्यातील ४० आरोपीं विरूध्द महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये त्यांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,अशीही माहिती पोलिस अधीक्षक उपाध्याय यांनी दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या