💥महाराष्ट्र राज्यात आज २७३९ नवे कोरोनाचे रुग्ण ; १२० रुग्णांचा मृत्यू...!



💥सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू,अशी माहिती आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली💥

मुंबई (दि.०६ जुन ) : राज्यात आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असल्याने राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ८२ हजार ९६८ वर पोहचली आहे.आज राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.तर २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ९० (मुंबई ५८, ठाणे १०, उल्हासनगर ६, वसई विरार १, भिवंडी ३, मीरा-भाईंदर ५, पालघर १), नाशिक- ७ (नाशिक ५, मालेगाव २), पुणे- १७ (पुणे १०, सातारा ५, सोलापूर २), औरंगाबाद-२ (औरंगाबाद मनपा २), अकोला-४ (अकोला मनपा २, अमरावती २)
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७८ पुरुष तर ४२ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५३ रुग्ण आहेत तर ४७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २० जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये ( ५७.५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २९६९ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  ३ मे ते ३ जून या कालावधीतील आहेत.या कालावधीतील ९० मृत्यूंपैकी मुंबई ५३, मीरा भाईंदर – ५, भिवंडी -३,ठाणे -९, उल्हासनगर -६,नवी मुंबई -६, सातारा- २,  वसई विरार -१, अमरावती -१, औरंगाबाद -१, मालेगाव- १, नाशिक -१ , सोलापूर १असे मृत्यू आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (४७,३५४), बरे झालेले रुग्ण- (१९,९७७), मृत्यू- (१५७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५,७९४)
ठाणे: बाधीत रुग्ण- (१२,४६४), बरे झालेले रुग्ण- (४६८६), मृत्यू- (३२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४५६)
पालघर: बाधीत रुग्ण- (१३८६), बरे झालेले रुग्ण- (५८१), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७६६)
रायगड: बाधीत रुग्ण- (१४११), बरे झालेले रुग्ण- (७१७), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३७)
नाशिक: बाधीत रुग्ण- (१४१२), बरे झालेले रुग्ण- (१०१२), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१२)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३)
धुळे: बाधीत रुग्ण- (२३१), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०२)
जळगाव: बाधीत रुग्ण- (९६३), बरे झालेले रुग्ण- (६११), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४३)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८)
पुणे: बाधीत रुग्ण- (९२८९), बरे झालेले रुग्ण- (५१९५), मृत्यू- (४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६९४)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (१२६१), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४५)
सातारा:  बाधीत रुग्ण- (६२६), बरे झालेले रुग्ण- (२९१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०८)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६३८), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९८)
सांगली: बाधीत रुग्ण- (१८५), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६)
रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (३५२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८४)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१८६१), बरे झालेले रुग्ण- (११८१), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८८)
जालना: बाधीत रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (८५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२०६), बरे झालेले रुग्ण- (१६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३)
परभणी: बाधीत रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
लातूर: बाधीत रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (९४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)
बीड: बाधीत रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१४)
नांदेड: बाधीत रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)
अकोला: बाधीत रुग्ण- (७६२), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८७)
अमरावती: बाधीत रुग्ण- (२८९), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०५)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (८६), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५)
वाशिम: बाधीत रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१)
नागपूर: बाधीत रुग्ण- (७३८), बरे झालेले रुग्ण- (४१६), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३११)
वर्धा: बाधीत रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१)
भंडारा: बाधीत रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११)
चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (३१), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)
एकूण: बाधीत रुग्ण-(८२,९६८), बरे झालेले रुग्ण- (३७,३९०), मृत्यू- (२९६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(४२६००)..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या