💥पुर्णेतील बौध्द विहारात आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नांदेड मनपाचे जेष्ठ नगरसेवक गजभारे उपस्थित होते💥
पूर्णा (दि. 05 जुन)/बुद्ध विहार, पूर्णा येथे जेष्ठ पोर्णिमेनिमित्त भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून त्रिसरण-पंचशील, त्रिरत्न वंदना आणि परित्राण पाठ मोजक्या उपासक उपासकांच्या उपस्थितीमध्ये पौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळच्या सत्रामध्ये मार्गदर्शन करतांना 'महामानव तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणले पाहिजे' असे भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी सांगितले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व नांदेड महापालिकेचे जेष्ठ नगरसेवक बापुराव गजभारे उपस्थित होते.
यावेळी गजभारे यांनी भिक्खू संघास भेटवस्तू व फळदान दिले. बुद्ध विहाराचे महत्व विषद करतांना बापूराव गजभारे यांनी सांगितले की, 'बुद्ध विहारामधून प्रज्ञा, शील, करुणा व मानवतेची महान शिकवणूक मिळते. आज माझा वाढदिवस असल्याने मी पूज्य भन्तेगनाचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे.
यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष अमृतराव मोरे, टि. झेड. कांबळे, पत्रकार विजय बगाटे, गौतम वाघमारे, लक्ष्मण शिंदे, नगर सेवक हर्षवर्धन गायकवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले...
0 टिप्पण्या