💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात आज पुन्हा ३ कोरोना संशयीत दाखल प्रलंबीत स्वॅबची संख्या २५....!



💥पेडगावातील महिला औरंगाबादेत पॉझीटीव्ह,जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केली कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ💥

परभणी (दि.१३ जुन) - कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज शनिवार दि.१३ जुन रोजी सायं.०६-०० वाजेपर्यंत ३ संशयित दाखल झाले असून प्रलंबीत स्वॅबची संख्या २५ एवढी आहे.दरम्यान, जिल्ह्यातील पेडगाव येथील महिला औरंगाबादेत पॉझीटीव्ह आढळल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ केली नाही.

दरम्यान, पेडगाव हे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हा महसुल प्रशासनाने जाहीर केले आहे.एकूण संशयित रुग्णांची संख्या २५१५ असून २७१० पैकी २४७० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.८० संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत.४३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातून शनिवारी ३ संशयतिचा स्बॅव नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. जिल्हा शासकीय रूग्णालयात शनिवारपर्यंत विलगिकरण कक्षात १२५,रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात ३९ जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले २३५१ जण आहेत. जिंतूर तालुक्यातील सावंगी(भांबळे) येथील एका महिलेस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या