पूर्णा- मनसे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहर शाखेच्या वतीने ५२ गरजू कुटूंबांना सामाजिक कर्तव्याची जाण ठेवत अन्न धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
सदरील उपक्रम परभणी जिल्ह्याध्यक्ष श्री.रुपेश सोनटक्के, विद्यार्थी सेनेचे जिल्हासचिव श्री.निशांत कमळू, तालुका अध्यक्ष श्री.आनंद बुचाले यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर अध्यक्ष श्री.गोविंद(राज) ठाकर यांनी आयोजित केला होता.
"कोरोना महामारी मुळे अनेक कुटूंबांना दैनंदिन जीवनात अडचणी येत आहेत. आयोजित केलेला उपक्रम मदत नाही तर ते आमचं सामाजिक कर्तव्य आहे" अशी प्रतिक्रिया आयोजक शहर अध्यक्ष श्री.गोविंद(राज) ठाकर यांनी दिली.
या प्रसंगी पवन बोबडे,पंकज राठोड,राजेश यादव,शेख गुड्डू, शेख माजिद अली खान, अधिराज वळसे,भागवत ढोणे, हनुमान भालेराव,भारत काळे,विष्णू चापके, बालाजी जोगदंड तसेच तालुका व शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या