💥पुर्णा तालुक्यातील सुकी येथील एकनाथ काळबांडे यांचे एमपीएससी परिक्षेत यश...!💥तालुक्यातील शेतकरी पुत्र झाला उप जिल्हाधिकारी💥

पुर्णा [दि.20 जुन] नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पुर्णा तालुक्यातील सुकी येथील एकनाथ काळबांडे यांनी यश संपादन केले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाची उप जिल्हाधिकारी या पदावर निवड झाली असुन त्यांच्यावर जिल्हाभरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या  राज्य लोकसेवा आयोगाच्या निकालात पुर्णा तालुक्यातील सुकी येथील एकनाथ काळबांडे यांनी यश संपादन केले असुन उप जिल्हाधिकारी या पदावर त्यांची निवड झाली आहे. पुर्णा तालुक्यातील सुकी येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एकनाथ काळबांडे यांचे प्राथमिक शिक्षण तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयात झाले तर परभणी येथील मराठावाडा हायस्कुल मधुन ते दहावी उतिर्ण झाले  त्यांनी संत तुकाराम महाविद्यालयातुन बी.ए.ची पदवी प्राप्त केल्या नतंर  सन 2010 ते 2018 या कालवधीत एल.आय.सी मध्ये नौकरी केली. परंतु प्रशासकीय अधिकारी बनून देशसेवा करण्याचे स्वप्न मनासी पक्के असल्याने त्यांनी सतत चार वेळा एम.पी.एस.सी.ची परिक्षा दिली. सन 2018 मध्ये त्यांची सहाय्यक निंबधक पदी निवड झाली. सध्या ते अकोला येथे कार्यरत आहेत. दिवसभर कार्यलयीन कामकाज करुन 4 ते 5 तास व सुटीमध्ये 10 ते 12 तास खडतर अभ्यास करत यंदाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत उप जिल्हाधिकारी पदावर त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्वस्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
******************************************
स्पर्धा परिक्षा देतांना उदिष्ट्य निश्चित करुन सातत्यपुर्वक अभ्यास केल्यावर यश निश्चित मिळते.
... एकनाथ काळबांडे (उपजिल्हाधिकारी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या