💥पुर्णा तालुका कोरोना विषाणूंच्या स्वागतासाठी झाला सज्ज ? नागरिक विसरले सामाजिक अंतर राखण्याचे भान...!💥शासकीय नियमांची पायमल्ली प्रशासनाचे संपूर्णतः दुर्लक्ष व्यापार पेठेत तुफान गर्दी लोक तोंडावर मास्क लावणेही विसरले💥

पुर्णा(दि.१३ जुन) कोरोना व्हायरस कोविड-१९ या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण राज्यात दि.२३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊनसह संचारबंदी लागु केली होती कोरोना बाधीत रुग्णांची संख्या अत्यल्प असतांना शासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलून जनसामान्यांना कोरोना विषाणूंच्या संसर्गा पासून वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तब्बल अडीच महिण्याच्या दिर्घ कालवधी नंतर लॉकडाऊनसह संचारबंदीत शिथिलता देण्यात आली या अडीच महिण्याच्या कालावधीत कोविड-१९ या आजाराचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यासह तालुक्यातील जनता प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करीत स्वतःचा बचाव करीत अत्यावश्यक वस्तूंसह अन्य आवश्यक वस्तूंची खरेदी करेल व स्वतःच्या कुटुंबासह परिसरातील नागरिक कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कोरोना विरोधातील शासनाच्या लढाईला पाठबळ देईल अशी आशा बाळगली जात होती परंतु पुर्णा शहरासह तालुक्यातील परिस्थिती पाहता असे निदर्शनास येत आहे की जनतेला कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाचे यत्किंचितही गांभीर्य राहिलेले नाही.

लॉकडाऊन संचारबंदी शिथिल होताचशहराला जत्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे.शहरातील किराणा दुकान,कापड दुकान,हार्डवेअर शेती अवजार विक्रीची दुकाने पानटपऱ्या,चहा नाष्टा स्टॉल्स,आदींसह फळ-भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत असून लोक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे यत्किंचितही पालन करतांना दिसत नसून त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे अश्या सार्वजनिक ठिकाणी लोक तोंडावर मास्कचाही वापर करीत नसल्याने तालुक्याने 'कोरोना व्हायरस' या जागतिक महामारीवर खरोखरच मात केली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्हा प्राशासनाने कोविड-१९ पासून बचावासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा सक्तीने वापर करण्याचे दिलेले निर्देश लोक अक्षरशः पायदळी तुडवतांना पाहावयास मिळत आहेत.


 तालुक्यात रेड झोन जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत असून शहरासह तालुक्यात होणाऱ्या शासकीय विकासकामांवर काम करणाऱ्या मजुरांच्या व अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या मजूरांमुळे कोरोना संसर्गाचा प्रचंड धोका वाढण्याचे संकेत मिळत आहेत.लॉकडाऊन संचारबंदीतील अडीच महिण्याच्या कालावधीत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता सैनिटायझर फवारणीसह कुठलीही उपाययोजना न करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाने लॉकडाऊन संचारबंदी शिथिल होताच शहरातील नाल्यांच्या बांधकामांना सुरूवात केल्याने या कामावरील काम करणाऱ्या असंख्य बांधकाम मजुरांच्या आरोग्य सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.एकंदर शहरासह तालुक्यातील परिस्थिती पाहता असे निदर्शनास येत आहे की संपूर्ण तालुका पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे व प्रशासनाने ही कोरोना विषाणूंच्या स्वागतासाठी गालीछे अंथरल्याचे निदर्शनास येत आहे.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका.शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या परंतु त्यांच्या आवाहनासह जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे लोक पालन करीत नसल्यामुळे पुढील काही काळात संपूर्ण तालुका कोरोना विषाणूंच्या विळख्यात सापडण्याची भिती जानकारांतून व्यक्त होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या