💥नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा झाला तिनशें पार...!



💥जिल्ह्यात १८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १०२ रुग्ण हे उपचार घेत आहेत💥

नांदेड[दि.१९ जुन] जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या पाहाता पाहाता तिनशेंच्या पार झाली आहे.आज शुक्रवार दि.१९ जुन रोजी दिवसभरात एक रुग्ण सापडला होता,तर काही अहवाल पुन्हा आले असून यात ती ३ रुग्ण सापडले असून हे रुग्ण स्थलांतरित होऊन आलेले आहेत.


आज शुक्रवारी सायंकाळी प्रशासनाकडून ४८ कोरोना संशयीतांच्या स्वाबच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला.यात ४७ अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला.सदरचा रुग्ण २३ वर्षीय असून शहरातील सुंदर नगर भागातील आहे.
यानंतर काही मिनिटापूर्वी तीन अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले असून तिन्ही महिला आहेत.विशेष म्हणजे या तिन्ही महिलांची कोरोना पार्श्वभूमी इतर जिल्ह्यातील आहे.
इतवारा भागातील मंडई येथील ४५ वर्षीय हैद्राबाद येथून आलेली आहे.नाथ नगर भागातील १२ वर्षीय मुलगी ही पुण्यावरून आली तर याच भागातील मुलगी जिचे वय १६ असून ती सुद्धा काही दिवसांपूर्वी पुणे येथून आली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांनी ३०० आकडा पार केला आहे.१८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १०२ रुग्ण हे उपचार घेत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या