💥बिड जिल्ह्यातील परळी शहरात उस्मानी जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या...!



💥आत्महत्या प्रकरणी त्या नराधम तरुणाविरुद्ध अँट्रासिटीचा गुन्हा दाखल💥

परळी वैजनाथ : शहरातील जगतकर गल्लीत राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने गावातील तरुणाच्या सततच्या छेडछाडीस कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी त्या नराधम तरुणाविरुद्ध अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी वैजनाथ शहरात जगतकर गल्लीत राहणारी निकीता सखाराम जगतकर (वय२४) ही तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. कॉलेजला जात येत असताना तरुण उस्मान लतीफ शेख हा तिला सतत त्रास देत होता.तसेच मोबाईल नंबर मिळवून फोनवरही सतत भेटण्याची विनंती करत होता. हा होणारा त्रास तरुणीने वडीलांना सांगितला. वडीलांनी त्याचा फोन घेऊ नको असा सल्ला दिला. वडील आपल्या नातेवाईकांना घेऊन उस्मान शेखच्या घरी जाणार होते. पण या तरूणीने आई वडील बाहेर गावी गेल्यानंतर १२ जूनला आत्महत्या केली.
 दुपारी आई, वडील आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वडीलांनी उस्मान शेख मुळेच मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून २४ जूनला संभाजीनगर पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस हे करत आहेत..
--------------------------------------------------------------------
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरात धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणीला तिच्याच गावातील तरुण सतत त्रास द्यायचा. फोन करून मला भेट असा म्हणायचा. घरच्यांना सांगितले पण त्यांनी नीट समजावून सांगू असे म्हणत सांत्वन केले. मात्र तिच्या मनात कायम भीती होती. अखेर त्याच्याच जाचाला कंटाळून तीने आत्महत्या केली.
-------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या