💥परभणी जिल्ह्यात आणखीन २ कोरोेनाबाधित रूग्ण आढळले,जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या-88..!💥आढळलेल्या कोरोना बाधीत रुग्णांत परभणीतील मिलिंद नगर व पाथरी तालुक्यातील रामपूरीतील एकाचा समावेश💥

परभणी-(दि.04 जुन)-गेल्या दोन दिवसांपुर्वी एकूण 4 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल बुधवार दि.03 जुन 2020 रोजी राञी नांदेड येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालानुसार दोन व्यक्तीचे स्वॅब पॉझीटीव्ह आढळून आले आहेत यात परभणीतील मिलिंद नगर व पाथरी तालुक्यातील रामपूरीतील कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.मानवत शहरातील तीन व जिंतूर तालुक्यातील एक असे चौघां संशयितांच्या स्वॅबचा अहवाल सोमवारी रात्री पॉझीटीव्ह आला होता. परिणामी जिल्हा प्रशासन अक्षरक्षः अस्वस्थ झाले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाकडे जाईल की काय, अशी भिती निर्माण झाली असतांना बुधवारी नांदेड येथील प्रयोगशाळेकडून एकूण 32 स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 32 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे.

 सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील 39 वर्षीय पुरूष, ब्रम्हवाकडी येथील 25 वर्षीय पुरूष व चिकलठाणा येथील 25 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. राञी गंगाखेड तालुक्यातील तिघांना सुट्टी देण्यात आली.त्यामुळे परभणीकरांना दिलासा मिळाला.
दरम्यान, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात काल बुुधवारी संशयितांची संख्या 2431 पर्यंत पोचली आहे. 193 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत.

एकूण 2589 पैकी 2205 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ८८जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर 72 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 33 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण 193 स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून बुधवारी एकूण 102 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात बुधवारपर्यंत विलगिकरण कक्षात 497, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 250 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1684 जण आहेत. आतापर्यंत असलेल्या एकूण ८८ पॉझीटीव्ह पैकी ३१जण बरे होवून घरी गेले आहेत. मृत्यू पावलेले 2 तर कक्षात उपचार घेणारे ३३ रुग्ण आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या