💥बिड शहरात 7 तर धारूर जवळील चिंचपूरमध्ये आढळले 2 कोरोना बाधीत रुग्ण...!




💥जिल्ह्याचा एकूण कोरोना बाधीतांचा आकडा आता 101 एवढा झाला💥 

बिड (दि.२० जुन) - जिल्ह्यातून आज 76 जणांच्या घशातील लाळेचे तपासणीसाठी स्वाराती प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या सॅम्पलचा अहवाल प्राप्त झाला असून 9 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. बीडमध्ये 7 तर धारूर जवळील चिंचपूरमध्ये 2 जण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा आता 101 एवढा झाला आहे.

आजच्या अहवालकडे बीडवासियांचे लक्ष लागले होते. कारण जिल्हाभरातून जे 76 सॅम्पल पाठवले होते त्यात 61 सॅम्पल बीड शहरातील होते. त्या सह केजमधून 8, अंबाजोगाईमधून 2, आष्टीतून 1, परळीमधून 3 तर माजलगावमधून 1 सॅम्पल तपासणीसाठी पाठवला.

शनिवारी सायंकाळी याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात कोरोना बाधित असल्याचे 9  रुग्ण स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्ण संख्या 101 झाली आहे. कालपर्यंत एकूण 92 कोरोना बाधित सापडले होते. त्यापैकी 70 जणांनी कोरोनावर विजय मिळवला तर 19 जण बीडच्या रुग्णालयात उपचार घेत होते. आज तिघा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आणि तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण रुग्ण संख्या  101 एवढी झाली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या