💥सासरी नेऊन सोडतो असे म्हणून माहेराहून आणलेल्या 27 वर्षीय विवाहितेवर नराधमाने केला बलात्कार...!💥पुर्णा तालुक्यातील माटेगाव शिवारात घडली घटना नराधमा विरोधात गुन्हा दाखल💥

पुर्णा(दि.05 जुन) येथील सासरी नेऊन सोडतो असे म्हणून माहेरात असलेल्या विवाहितेस तालुक्यातील माटेगाव शिवारात सदरील परिसरात विवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणी आज शुक्रवार दि.05 जून रोजी एका नराधमा विरोधात पुर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटने संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर येथे आपल्या माहेरी असलेल्या एका 27 वर्षीय विवाहितेला याच गावातील आरोपी नराधम प्रसाद कांबळे याने तुला पूर्णा येथील तुझ्या सासरी नेऊन सोडतो असे म्हणत तिला दि.30 मे 2020 रोजी रात्री मोटरसायकल बसवून आणले पुर्णा येथे आणून तालुक्यातील माटेगाव शिवारात नेऊन तिच्यावर बलात्कार केला व कोणालाही सांगितले तर तुझा संसार मोडून जीवे मारण्याची धमकी दिली.
  या प्रकरणी पिडित विवाहितेच्या फिर्यादी वरून सुरवातीस नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला परंतु सदरील घटना ही पूर्णा हद्दीत घडल्याने हा गुन्हा पूर्णा पोलिसात वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास सपोनि रमाकांत नागरगोजे हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या